Saturday, June 15, 2024

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

💐🪗🎤🎹🎧💐




कोकणची स्वरभैरवी म्हणून नावारूपाला आलेली उदयोन्मुख गायिका कु.भैरवी सुनिल जाधव हिचा आज वाढदिवस.गेले काही वर्ष स्वरभैरवी या भाव व भक्तीगीतांच्या सुरेल कार्यक्रमातून रसिकांच्या मनाचा काळिजकोपरा व्यापत तिने अधिराज्य गाजवायला सुरवात केली आहे. या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून संधी मिळाल्याने भैरवीच्या सुरेल स्वरांच्या सप्तरसात न्हाऊन निघण्याची अधिक जवळून संधी मिळाली. त्याच वेळी येणाऱ्या दशकात मराठी संगीत क्षेत्रात भैरवी आपले नाव सार्थ करेल हा विश्वास देखील दृढ झाला.


    संगीताचा पिढीजात वारसा लाभलेल्या संगीतसाधना करणाऱ्या घरात जन्माला आल्याने ठेवलेले भैरवी हे नाव सार्थ करित कृणाल म्युझिक च्या माध्यमातून तिने बालपणातच एक गायिका म्हणून पदार्पण केले आणि बघता बघता कुणाल म्युझिक सह विविध कंपन्यांसाठी प्रमुख गायिका म्हणून तिला संधी मिळाली.त्यातच तिचे आधारस्तंभ गुरु मार्गदर्शक या सर्व जबाबदा-या पार पाडणा-या  सुनिलबुवांनी सुरु केलेल्या सोहम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून भजनांचे कार्यक्रम, भाव व भक्तीगीतांचे कार्यक्रम करित आज ती घराघरात पोहचली आहे.यासाठी तिने स्वरबद् केलेली अनेक गीते लोकप्रिय झाली असून ती सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर प्रसिद्ध झाली आहेत.भैरवीच्या आवाजत स्वरमाधुर्य आहे.तिच्या ध्वनिमुद्रकांमधून आपण ते माधुर्य अनुभवल्यावर आपणही तिच्या गायकीचे चाहते व्हाल याचा विश्वास वाटतो.काहि दिवसांपूर्वी तिला एका चित्रपटातील गाण्यासाठी गायिका म्हणून संधी मिळाली असून तीथेही ती आपली स्वरमुद्रा उमठवेलच!


   संगीताची साधना करताना पुढे जायचे असेल तर सातत्यासोबत निर्गवी, मनमिळाऊ स्वभाव महत्वाचा.तो तिच्या ठायी असल्याने संगीतक्षेत्रातील ज्येष्ठांनी तुला मार्गदर्शन च आशीर्वाद दिले आहेत.सोबतच मुंबईतल्या प्रख्यात काॅलेजमधून पदवी संपादन करतानाच तिथल्याही युवा महोत्सवात तिने आपल्या रुईया महाविद्यालयात संगीत स्पर्धेत नेहमीच विजेतेपद मिळवून दिले आहे.तिच्या या यशस्वी वाटचालीची दखल अनेक संस्थानी घेत तिला युवा आयकाॅन म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.संगीतासोबतच व्यवसायिक डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर्स म्हणून वाटचाल करताना ग्राफिक्स डिझायनर्सचे शिक्षण घेऊन आपल्याच महाविद्यालयीन मैत्रीणींसोबत स्टार्टप केलेल्या 'ओके देन' या कंपनीत ती आपली प्रतिभा सिद्ध करित आहे.


  खरं तर पहाटेच्या वेळी आळवला जाणारा भैरव राग दिवसाची प्रसन्न सुरुवात करतो; तर कोणत्याही मैफलीची सांगता भैरवीने होते. मात्र या भैरवीचा सुरेल स्वर आपण कधीही ऎकला तरी तो मनाला प्रसन्नता देतो.एक सकारात्मक उर्जा प्रदान करतो.जगण्याला बळ देतो.आणि म्हणुनच येणा-या काळात आपल्या सर्वांची लाडकी कु.भैरवी आपल्या मधूर ,गोड ,सुरेल स्वरांनी संगीतातील सुरांचे विश्व व्यापू दे! हीच आजच्या दिवशी सदिच्छा!

💐💐💐💐

भैरवी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.


वि ज य ह ट क र

  ------------

 १५ जून २०२४






लांजा येथील प्रसिद्ध ज्योतिषी आप्पा जंगम यांच्या स्मृतिदिना निमित्त कार्यक्रम 


            मुंबईत स्वरभैरवी कार्यक्रमात..




लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित स्वरभैरवी कार्यक्रमात..




स्वातंत्र्यदिनानिमित्त वालोपे, ता.चिपळूण येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहातात आझादी स्पेशल स्वरभैरवी कार्यक्रम.





No comments:

Post a Comment