हॅप्पी बर्थडे शिर्के सर
@@@@@@
विद्वत्ता दक्षता शीलं,संस्कारान्तिरनुशीलम्।
शिक्षकस्य गुणा : सप्त्, सचेतस्व प्रसन्नता।।
शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सूक्तात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता,चारित्र्य (शील) संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य,आणि प्रसन्नता.या सूक्ताप्रमाणेच शीलवान,संस्कारक्षम,चारित्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी,साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, माझे मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री शिर्के सर .
आजच्या बदललेल्या शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंधातहि विद्यार्थ्यांचा ओघ प्रशालेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप व समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तीमत्व. आज सरांचा वाढदिवस.
पण आजचा नेहमीपेक्षा थोडा अधिक विशेष. कारण लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा हा पहिला वाढदिवस.
आज सकाळपासून सरांना आदर्श मानणा-या विद्यार्थी,व हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती.समाजाच्या जडण -घडणीत शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.
आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणं शिकवितो.आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार ,नितिमूल्ये आपला नैतिक,मानसिक ,चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे व तेजोमयी विचारांकडे नेणारे लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिर्के सर यांचे माजी विद्यार्थी असोसिएशन तर्फे वाढदिवस अभीष्टचिंतन।
एक सुंदर लेख.गुरुविषयी आपले अपार प्रेम दिसून येते.अशीच गुरुविषयी असणारी निष्ठा कायम ठेवा.नक्कीच नवी ऊर्जा मिळेल.सुंदर लेखाबद्दल धन्यवाद
ReplyDelete